"आता काय करू...हातातोंडाशी आलेल पीक पण हातून गेलं,' ; माणचे शेतकरी चिंतेत

केराप्पा काळेल
रविवार, 2 ऑगस्ट 2020

यंदा चांगला पाऊस झाल्याने मशागतीसह पेरणीची कामे उसनवारी करून तर काही महिलांनी सौभाग्याचे लेण गहाण ठेऊन पेरणीसाठी पैसे घेतले होते. नांगरणी, कुळवणी, पेरणी आणि खुरपणी करून झाल्यानंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडलेले आहे.

कुकुडवाड (ता.माण, जि.सातारा) : कुकुडवाड परिसरातील विरळी, वळई, पुकळेवाडी, जांभुळणी, पाणवन गावांत नुकत्याच झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने बाजरी आणि मका पिके भुईसपाट झाली आहेत. नांगरणी, कुळवणी, पेरणी आणि खुरपणी करून झाल्यानंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडलेले आहे. काही शेतकऱ्यांना तर शेतात रडू आले.
अभिनेते सयाजी शिंदेंची झाडांशी घट्ट मैत्री...! 
 
कुकुडवाड परिसरातील पिकांचे सायंकाळी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्याने विद्युत खांब कोसळले. हातातोंडाशी आलेली बाजरीची पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. मागील अनेक दिवसांपासून सतत पाऊस असल्याने डोलदार बाजरीची पिके शिवारात डोलत होती. मात्र, सुसाट वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेले बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे. काही भागांत नुकतीच कांदा लागवड झाली असून, अवकाळी पावसामुळे कांदा रोपे पाण्याखाली गेली. शेतात पाणी साचल्याने कांदा रोपांना याचा फटका बसणार आहे.  

पाटणमध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती; बळीराजा हवालदिल 

शेतकऱ्यांनी या वर्षी खरीप हंगामात बाजरीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली होती. यंदा चांगला पाऊस झाल्याने मशागतीसह पेरणीची कामे बॅंका, विकास सेवा सोसायट्याकडून कर्ज न मिळाल्याने उसनवारी करून तर काही महिलांनी सौभाग्याचे लेण गहाण ठेऊन पेरणीसाठी पैसे घेतले होते. नांगरणी, कुळवणी, पेरणी आणि खुरपणी करून झाल्यानंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडलेले आहे. काही शेतकऱ्यांना तर शेतात रडू आले. "आता काय करू...हातातोंडाशी आलेल पीक पण हातून गेलं,' अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

संपादन - संजय शिंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers From Mann Taluka Worried About Farm And Crops