
सातारा : रब्बी हंगामात पीक कर्ज घेण्याकडे शेतकऱ्यांत उदासीनता दिसत आहे. जिल्ह्याला रब्बीसाठी असलेल्या १२८० कोटींच्या उद्दिष्टापैकी केवळ २२ टक्केच कर्ज वितरण झाले आहे. जिल्ह्यातील १३ हजार १४० शेतकऱ्यांनीच कर्ज घेतले आहे. यामध्ये खासगी व इतर बॅंकांच्या तुलनेत सर्वात कमी कर्ज वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे झाले आहे. रब्बी हंगामासाठी पीक कर्ज घेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.