
उंब्रज : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येथे मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला. काल रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर येथील पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. राहुल सोमा जावळे (वय ३०, रा. उंब्रज) असे अपघातातील मृताचे नाव आहे, तर दशरथ विष्णू कुडाळकर हे जखमी झाले आहेत.