
सांगवी : बारामतीहून फलटणकडे येणाऱ्या मोटारीने आज सकाळी सोमंथळी (ता. फलटण) हद्दीतील सरकारी मळ्यानजीक एका दुचाकीस्वारास धडक दिल्याने जोरदार अपघात झाला. यामध्ये सस्तेवाडी (ता. फलटण) येथील सद्दाम फरास हा युवक जागीच ठार झाला, तर त्याच्याबरोबर असणारा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून, युवराज चव्हाण असे त्याचे नाव आहे.