
ढेबेवाडी : शेतीत जिद्द, आत्मविश्वासाला कष्टाची जोड मिळाली, की स्वप्नवत वाटणाऱ्या बाबीही सत्यात उतरतात, हे तुळसण (ता. कऱ्हाड) येथील प्रगतशील शेतकरी आनंदा वीर व त्यांचे सुपुत्र राहुल या पिता-पुत्रांनी सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या ८८ दिवसांत त्यांनी एका एकरात काकडीचे सुमारे तीन लाखांचे उत्पन्न घेतले. काकडीसाठी त्यांनी शिवारात उभारलेला ढाच्या पुढे आणखी दोन पिकांसाठीही उपयोगी ठरणार असल्याने खर्चातही बचत होऊन नफ्यात वाढ शक्य आहे.