बामणोली पर्यटकांसाठी फेव्हरेट!

वासोटा किल्ला ट्रेकसाठी महाराष्ट्रभरातून ट्रेकर्स येत असतात.
बामणोली पर्यटकांसाठी फेव्हरेट!
Updated on

कास : चार दिवसांनी पावसाने उघडीप घेतल्याने अनोख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कास, बामणोली, सह्याद्रीनगर, तापोळा, दत्त मंदिर (शेंबडी), मुनावळे, वासोटा किल्ला या परिसरात पर्यटकांची रेलचेल पाहावयास मिळाली.

पावसाच्या उघडिपीने पूर्ण स्वच्छ झालेले निरभ्र आकाश, सह्याद्रीच्या गर्द झाडीने नटलेल्या डोंगररांगा आणि खाली कोयनेचा १०० टीएमसीचे निळेशार पाणी हे अनोखे निसर्ग सौंदर्य डोळे तृप्त करत होते. कोयनेचे पाणी कमी होऊ लागल्याने पाण्यात आयलॅंड दिसू लागली असून, या आयलॅंडवरही पर्यटकांची गर्दी होत आहे. बामणोली, मुनावळे, शेंबडी येथील बोट क्लबच्या माध्यमातून बोट सेवा पुरवली जाते. सह्याद्रीनगर गावच्या डोंगर माथ्यावरून कोयना व वेण्णा खोरे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. येथून दिसणारा सूर्योदय, सूर्यास्त व पवनचक्क्या प्रकल्प ही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. बामणोली व तापोळा येथील विविध बोटींच्या माध्यमातून येणारी बोटिंगची धमाल व कोयनेच्या निळ्याशार पाण्यातील सफर पर्यटकांना वेगळ्या दुनियेत नेते. विनायकनगर येथील नारायण महाराजांचा मठ आध्यात्मिक समाधान देऊन जातो.

जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराचा फुलांचा हंगाम संपला असला, तरी येथील कासचा तलाव पर्यटकांना बारमाही खुणावत असतो. कासच्या तलावाकाठी बसून निवांतपणे गप्पागोष्टी, पाण्यात मौजमस्तीचा आनंद पर्यटक घेत असतात. हिवाळ्याची चाहूल लागली असून, पर्यटनासाठी चांगले वातावरण तयार झाले आहे. निसर्गसौंदर्य, ट्रेकिंग, बोटिंग, जंगल सफर असे विविध पर्याय उपलब्ध असलेल्या या भागात पर्यटकांना पर्यटनाचा आनंद मिळत आहे.

वासोटा किल्ला ट्रेकलाही पसंती

वासोटा किल्ला ट्रेकसाठी महाराष्ट्रभरातून ट्रेकर्स येत असतात. कोयनेच्या शिवसागर जलाशयातून बोटीने दीड तासांचा नयनरम्य प्रवास ॲमेझॉन खोरेची आठवण करून देतो, तर नंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात वसलेला वासोट्याचा डोंगर चढताना समृद्ध जंगल व प्राणी जगताची ओळख करून देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com