esakal | गॅस्ट्रोसदृश साथीने मल्हारपेठेत खळबळ; नागरिकांना उलट्या जुलाबाचा त्रास
sakal

बोलून बातमी शोधा

Gastro Disease

चार दिवसांपासून मल्हारपेठमध्ये नागरिकांना उलट्या जुलाबाचा त्रास होत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत खडबडून जागी झाली आहे.

गॅस्ट्रोसदृश साथीने मल्हारपेठेत खळबळ; नागरिकांना उलट्या जुलाबाचा त्रास

sakal_logo
By
विलास माने

मल्हारपेठ (सातारा) : मल्हारपेठमध्ये गॅस्ट्रोसदृश (Gastro Disease) साथीमुळे खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत (Gram Panchayat), आरोग्य विभागाकडून (Health Department) मुख्य पाणीपुरवठा टाकीची पाहणी करण्यात आली आहे. गावामध्ये मेडिक्‍लोअरचे वाटप करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. (Fear Among The Citizens Of Malharpeth Due To Gastro Disease Satara News)

मल्हारपेठमध्ये आतापर्यंत सहा नागरिकांना उलट्या झुलाबाचा त्रास झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत खडबडून जागी झाली आहे. सकाळपासूनच आरोग्य केंद्राबाहेर उपचारासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. उलट्या, जुलाब असणारे रुग्णाची कोरोना टेस्टही करण्यात आली.

चार दिवसांपासून मल्हारपेठमध्ये नागरिकांना उलट्या जुलाबाचा त्रास होत आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतील, पाइपलाइनमधून येणारे पाणी तपासणीसाठी घेतले आहे. ग्रामस्थंना मेडिक्‍लोअरचे वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. मल्हारपेठमध्ये पहिल्यांदाच गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभागावर ताण आला आहे. कोरोनाचे (Coronavirus) मल्हारपेठमध्ये संख्या वाढत असताना आता गॅस्ट्रोने डोकेवर काढल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: साताऱ्यात कडक Lockdown! कोणावर उपासमारीची वेळ, तर कोणाला मासे पकडण्याचा छंद; पाहा Photos

प्रत्यक्षदर्शी सध्या तशी परिस्थिती दिसून येत नाही, तरीही नागरिकांनी खबरदारी घ्यावी. आम्ही पाणीपुरवठा टाकी, विहिरीची पाहणी केलीय. नळ पाणीपुरवठा वितरण पाईपलाइन दुरूस्ती नाही, तरीही उद्यापासून मेडिक्लोरचे घरटी वाटप करणार आहे.

-एस एच. पवार. ग्राविकास अधिकारी मल्हारपेठ

Fear Among The Citizens Of Malharpeth Due To Gastro Disease Satara News