
सातारा : शेती पिकांच्या उत्पादनवाढीसाठी सतत लागणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीत काही कंपन्यांकडून नवीन वर्षात एक जानेवारीपासून वाढ केली जाणार आहे. या खतांच्या किमती प्रतिबॅग १५० ते २०० रुपयांनी महागणार असल्याने आगामी खरीप हंगाम, चालूच्या ऊस लागणी करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येणार आहे.