व्यापाऱ्यांच्या चाचणीत कऱ्हाडला पंधराजण आढळले बाधित

व्यापाऱ्यांच्या चाचणीत कऱ्हाडला पंधराजण आढळले बाधित

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरात कोरोनाच्या चाचणीसह लस देण्याची क्षमता पालिकेने वाढवली आहे. दररोज किमान दोन हजार लोकांना लस देता येईल, अशी सोय पालिकेने केली आहे. शासनाकडून लशीचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याने पालिकेच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. दरम्यान कोरोनाच्या चाचणीच्या मर्यादा वाढवल्या आहेत. पालिकेने एक हजार व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचणी केल्या आहेत. त्यात 15 व्यापारी, विक्रेते पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या 84 झाली आहे.
 
बुधवारी रात्री तालुक्‍यात 49 बाधित झाले आहेत. त्यात शहरातील 10 बाधितांचा समावेश आहे. शहरात 12, शनिवार पेठेत पाच, बुधवारात दोन, तर शुक्रवार, रविवार, सोमवार पेठेत प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे पालिकेने कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. शहरात आजअखेर एक हजार व्यापाऱ्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यात 15 व्यापारी कोरोनाबाधित आहेत. 

एकाच दिवशी चौघे जण बाधित आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. शहरात 84 कोरोनाचे ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. त्यात व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पालिकेने लसीकरणासह कोरोनाच्या चाचण्याचीही क्षमता आणि केंद्र वाढवले आहेत. त्यामुळे अधिक गती येणार आहे. शहरात एकाच दिवशी दोन हजार लोकांना लसीकरण करात येईल, अशी सुविधा पालिकेने केली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. ते म्हणाले, ""त्यासाठी चार केंद्रही केली आहेत. शासनाकडील लसीकरणाच्या तुटवड्याने कठीण स्थिती निर्माण होत आहे. लसीकरणानंतर काहींना त्रास होतो आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर दोन डॉक्‍टर्सची गरज आहे. त्यासाठीही आवाहन केले आहे. त्यानुसार काही जणांनी काम करण्याची तयारी दाखवली आहे. त्यांनाही लवकर सोबत घेण्यात येणार आहे. पालिका कर्मचारी, व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी लवकर पूर्ण करत आहे. त्यासाठी शासनानेही वेळेत टेस्टिंग किट देण्याची गरज आहे.''

फोटो काढून फेसबुकवर मिरवण्याशिवाय नगराध्यक्षांनी काहीच काम केलेले नाही
 

व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक : प्रांताधिकारी उत्तम दिघे 

वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी कऱ्हाड व मलकापूर शहरांसह तालुक्‍यातील सर्वच व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी करणे बंधनकारक केले आहे. व्यापाऱ्यांकडे अनेकजण ये-जा करत असतात. त्यामुळे ते सुपरस्प्रेडर ठरू नयेत, यासाठी प्राताधिकाऱ्यांनी नुकताच आदेश काढला आहे.

कऱ्हाड व मलकापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्‍यातही बाधित वाढू लागले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी येथे बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार दोन दिवसांपासून प्रांताधिकारी दिघे, पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी धडक मोहीम राबवून कार्यवाही सुरू केली आहे.

त्याअंतर्गत दुकानदारांवर कारवाई करून दुकानेही सील केली असून, अजूनही कारवाई सुरूच आहे. त्याचबरोबर प्रांताधिकारी दिघे यांनी नवीन आदेश काढून कऱ्हाड, मलकापूरसह तालुक्‍यातील व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यांच्याकडे सातत्याने ग्राहकांची वर्दळ असते. त्यातील एखादा व्यापारी बाधित झाल्यास ग्राहकांना त्याचा फटका बसू नये, यासाठी ही चाचणी बंधनकारक केल्याचे श्री. दिघे यांनी सांगितले.

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com