कोरोना नियमांचे उल्लंघन; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना नियमांचे उल्लंघन; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा

कोरोना नियमांचे उल्लंघन; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी केलेल्या निर्देशांचे व आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्यासह ८० जणांवर गुन्हा दाखल झाला. बंडातात्या कऱ्हाडकर यांना स्थानबद्ध करण्यासह वारीला बंदी घातल्याबद्दलचा निषेध मोर्चा सोमवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे कराडमध्ये काढण्यात आला होता. दत्त चौकातून मोर्चा थेट तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला होता. याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यासह 80 जणांवर कराड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आज सकाळी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत शिवप्रतिष्ठानतर्फे शहरात जमाव जमवून रॅली काढली व मंदिर प्रवेशास बंदी असताना मंदिर उघडून प्रवेश केला, असे फिर्यादीत नमूद आहे. हवालदार प्रशांत पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यात श्री. भिडे यांच्यासह सागर आमले, अजय पावस्कर, केदार डोईफोडे, प्रवीण माने, गणेश कापसे, रणजित पाटील, सुदर्शन पाटसकरसह ८० जणांवर गुन्हा दाखल आहे. बंडातात्या कऱ्हाडकर यांना शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून आषाढी वारीसाठी जाताना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. साईबाबा मंदिर उघडून प्रवेश केल्यावरून गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :CoronavirusSambhaji Bhide