
दहिवडी : घराच्या शेजारी रस्त्यावर वाहने आडवी लावण्याच्या कारणावरून एकाने दुसऱ्या व्यक्तीच्या बोटाचा असा चावा घेतला की अक्षरशः बोट तुटून पडले. याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डंगिरेवाडी (ता. माण) येथे भरत पंढरीनाथ जगदाळे यांच्या राहत्या घराच्या शेजारी रस्त्यावर वाहने लावली होती.