
खंडाळा : पळशी (ता. खंडाळा) येथील भंगार गोदामाला आज दुपारी मोठी आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने सहा अग्निशामक यंत्रणेद्वारे आग विझविणे सुरू होते. तब्बल चार तासांनंतर आग विझविण्यात यश आले. या आगीत १५ ते २० लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.