कऱ्हाडला लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचं नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire in Saw Mill

कऱ्हाड येथील मार्केट यार्डातील लक्ष्मी साॅमील वखारीला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. बुधवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास आग लागली.

कऱ्हाडला लाकडाच्या वखारीला भीषण आग; लाखोंचं नुकसान

- सचिन शिंदे

कऱ्हाड - येथील मार्केट यार्डातील लक्ष्मी साॅमील वखारीला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. बुधवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास आग लागली. पालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. आगीचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. मात्र शार्ट सर्कीटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

स्थानिकांनी आगीची माहिती तत्काळ अग्निशामक दल व पोलिसांना दिली. पालिकेच्या दोन्ही गाड्यासह सह्याद्री साखर कारखान्याच्याही अग्नीश्यामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. नागरिकांनीही मदतीसाठी गर्दी केली होती. पोलिस बंदोबस्तही होता. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले मात्र आग शॉर्ट सर्किटने आग लागली असावी. असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ती मील पटेल कुटूंबियांची आहे. चार दशकापासून तेथे वखार आहे. त्यांच्यालगत काही वखार आहेत. शहरात लाकडाच्या दहा वखारी आहेत. वखारी आग लागल्याची पहिलीच घटना आहे. वखारी शेजारीच ट्रान्सफॉर्मर असल्याने वीज कर्मचार्‍यांनी तात्काळ वीज पूरवठा बंद केल्याने मोठी दूघर्टना टळली.

टॅग्स :karadfire