
कऱ्हाड : शहरासह परिसरात ड्रग्ज व गांजांची विक्री करणाऱ्यांवर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने आज सकाळी कारवाई केली. त्यात ओगलेवाडी परिसरातून सुमारे ५० हजारांचे १० ग्रॅमचे ड्रग्ज जप्त केले. दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी येथील मुजावर कॉलनी परिसरातून गांजा जप्त केला. या दोन्ही कारवाईप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.