उषःकाल हाेता हाेता काळ रात्र झाली...! साता-यात खाद्यपदार्थ विक्रेते पाॅझिटीव्ह

उषःकाल हाेता हाेता काळ रात्र झाली...! साता-यात खाद्यपदार्थ विक्रेते पाॅझिटीव्ह

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी 495 जणांना कोरोनाची बाधा, तर एका बाधिताचा मृत्यू झाल्याचे समोर आले. सद्यस्थितीत सातारा व फलटण तालुक्‍यांत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहेत. सातारा शहरातील राजवाडा चौपाटी शुक्रवारी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान विविध ठिकाणी उपचार घेणाऱ्या 324 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटी- तिपटीने वाढ होऊ लागली आहे. गेल्या 15 दिवसांत 100, दोनशेची बाधितांची संख्या आता पाचशेच्या घराला पोचली आहे. काल रात्रीच्या अहवालानुसार सातारा तालुक्‍यात- 100, फलटण- 94, कऱ्हाड- 46 बाधित, माण- 29, खंडाळा- 15, वाई- 26, जावळी- 24, खटाव- 62, कोरेगाव- 55, महाबळेश्वर- 19, पाटण तालुक्‍यात 5 बाधित सापडले.

उपचारादरम्यान भांबेतील (ता. कऱ्हाड) 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, साताऱ्यातील राजवाडा चौपाटी सुरू झाल्यानंतर त्याठिकाणच्या व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात चौपाटीवरील पाच व्यावसायिक कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे सातारा पालिकेने राजवाडा चौपाटी भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला.
 

माेदी सरकारने मला जबरदस्ती निवृत्त केले; IPS अधिका-याचा फाेटाे व्हायरल

खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतला निर्णय
 
येथील राजवाड्यासमोरील गांधी मैदानावर पुन्हा एकदा चौपाटी सुरू करण्याच्या निर्णयावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत काही दिवसांपुर्वी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले हाेते. या निर्णयामुळे त्याठिकाणचे व्यावसायिक आनंदले हाेते. त्यानंतर  गेल्या शनिवारी तेथे गाडे लावण्यास सुरुवात केली हाेती. चौपाटीवर "एक व्यक्‍ती एक गाडा', धोरणामुळे येथे सर्वांनाच व्यवसायासाठी जागा उपलब्ध झाली आहे. गेली अनेक वर्षे राजवाड्यासमोरील गांधी मैदानावर चौपाटी भरत होती. अनलॉकनंतर ही चौपाटी पालिकेने पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील जागेत स्थलांतरित केली. यादरम्यान काहींनी ऑफिसर क्‍लबजवळील जागा मागत तोपर्यंत गांधी मैदानाची जागा तात्पुरती देण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे केली होती. याबाबतचा पाठपुरावा उपाध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक किशोर शिंदे हे करत होते. गांधी मैदानाबाबत विचारविनिमय सुरू असतानाच काही व्यावसायिकांनी खाद्यगाडे गांधी मैदानावर लावत त्याची माहिती खासदार उदयनराजेंना दिली हाेती.
 
त्यानंतर उदयनराजेंच्या उपस्थितीत पालिका अधिकारी, पदाधिकारी तसेच व्यावसायिकांची बैठक झाली. बैठकीत व्यावसायिकांच्या सर्व अडचणी ऐकून घेतल्यानंतर उदयनराजेंनी गांधी मैदान येथे चौपाटी सुरू करण्याची परवानगी व्यावसायिकांना स्वच्छता राखण्याच्या अटीवर देण्याच्या सूचना पालिका प्रशासनास केल्या. उदयनराजेंनी पुढाकार घेत चौपाटीचा विषय तडीस नेल्याने सुमारे 500 कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निकाली निघाला हाेता. 

दरम्यान, चौपाटीवरील व्यावसायिकांनी व्यवसायादरम्यान होणारा कचरा, घाण साफ करण्यासाठीच्या उपाययोजना स्वत: राबविणार असल्याचे हमीपत्र पालिकेस लिहून देणे आवश्‍यक केले हाेते. यानुसार कार्यवाही न करणाऱ्यांवर पालिकेकडून, तसेच चौपाटी व्यावसायिक संघटनेकडून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. 

राजवाडा चाैपाटीवरील हातगाडीधारकांनी नुकतीच काेराेना टेस्ट केली. त्यातील काही जणांचा अहवाल पाझिटीव्ह आला. यामुळे सुरक्षितता म्हणून प्रशासनाने राजवाडा चाैपाटी सात दिवस (2 एप्रिलपर्यंत) बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com