CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 511 कोरोनामुक्त; 27 मृत्यू

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 8 October 2020

सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांच्या मृत्यचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. दरराेज सरासरी 15 पेक्षा अधिक बाधितांचा मृत्यू हाेत आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासना सातत्याने करीत आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या उपचारादरम्यान 27 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान 511 जणांना उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले, तर 725 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 

गेल्या 24 तासांत उपचारादरम्यान 27 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सोनगाव (ता. सातारा) येथील 85 वर्षीय पुरुष, वेळेकामटी (ता.सातारा) येथील 49 वर्षीय पुरुष, वडूज येथील 65 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 82 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ (ता. सातारा) येथील 54 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 82 वर्षीय पुरुष, एकसळ (ता. कोरेगाव) येथील 7 दिवशीय बालक, मल्हारपेठ (सातारा) येथील 76 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (सातारा) येथील 75 वर्षीय महिला, आदर्की खुर्द (ता. फलटण) येथील 75 वर्षीय पुरुष, लिंब (ता. सातारा) येथील 70 वर्षीय महिला, विठ्ठलनगर खेड (ता. सातारा) येथील 85 वर्षीय महिला, चोरे (ता. कऱ्हाड) येथील 60 वर्षीय महिला, येळगाव (ता. कऱ्हाड) येथील 45 वर्षीय पुरुष, बेलवडे (ता. कऱ्हाड) येथील 60 वर्षीय महिला.

करमाळ्याच्या ऊस पट्ट्यात सुरू झाली ऊसतोडीची लगबग

हवेली (ता. कऱ्हाड) येथील 62 वर्षीय महिला, कानेगाव (ता. कऱ्हाड) येथील 76 वर्षीय पुरुष, हेळगाव (ता. कऱ्हाड) येथील 65 वर्षीय पुरुष, वडोली निळेश्वर (ता. कऱ्हाड) येथील 77 वर्षीय पुरुष, यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील 55 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शिवथर (ता.सातारा) येथील 65 वर्षीय पुरुष, शाहूपुरी (ता. सातारा) येथील 83 वर्षीय महिला, हणमंतनगर (ता. फलटण) येथील 65 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 57 वर्षीय पुरुष, कऱ्हाड येथील 75 वर्षीय पुरुष, शिवडे (ता. कऱ्हाड) येथील 73 वर्षीय महिला अशा एकूण 27 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली. 

सातारा : प्रत्येक प्राथमिक केंद्रात ऑक्‍सिजनची सुविधा

 

  • नमुने घेतलेले संशयित  1,54,540
  •  
  • एकूण बाधित  40,195
  •  
  • घरी सोडलेले रुग्ण  31,229
  •  
  • मृत्यू 1,300
  •  
  • उपचार सुरू असलेले रुग्ण  7,666

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Hundred Citizens Recovered From Covid 19 Satara News