मायणी - थंडीचे दिवस संपत आले. उन्हाळा जाणवू लागला, तरीही मायणी तलावात फ्लेमिंगोचे दर्शन झाले नाही. राज्यात ठिकठिकाणच्या पाणस्थळी दाखल झालेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांनी सध्या परतीच्या प्रवासास सुरुवात केल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे आता फ्लेमिंगो येथे दाखल होणार नसल्याने पक्षीप्रेमींचा हिरमोड झाला आहे.