सातारकरांनाे! पोलिसांचा तुमच्यावर आहे वाॅच; चुकाल तर भाेगाल

सातारकरांनाे! पोलिसांचा तुमच्यावर आहे वाॅच; चुकाल तर भाेगाल
Updated on

सातारा : साताऱ्यातील ग्रेड सेपरेटमधील एकेरी मार्गिकेत घुसखोरी करणाऱ्यांना वाहतूक शाखेच्या पथकाने दणका देण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या दाेन दिवसांत दंडात्मक कारवाया करुन वाहनधारकांना समज देण्यात येत आहे. आगामी काळात बेशिस्त वाहनचालकांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सातारा शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दिली.
 
खासदार उदयनराजे भोसले यांनी पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण केल्यानंतर त्यातून वाहतूक सुरू आहे. आतील भुयारी मार्गिकांची माहिती नसल्याने अथवा इतर कारणांमुळे अनेक सातारकर आपली वाहने एकेरी मार्गिकेत घुसवून चुकीच्या दिशेने दामटत आहेत. या प्रकारामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका होता. 

याबाबत वारंवार तक्रारी झाल्यानंतर सातारा शहर वाहतूक शाखेच्या पथकाने ग्रेड सेपरेटरमधील भुयारी मार्गिकांवर लक्ष केंद्रित केले. एकेरी भुयारी मार्गिकेत घुसखोरी करणाऱ्या रिक्षा, चारचाकी, दुचाकीधारक अशा पाच जणांवर नुकत्याच कारवाया केल्या. आगामी काळात ग्रेड सेपरेटरमधील वाहतुकीचे नियम डावलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली. 

इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 29 दिवसांत पुर्ण करणा-या सुफियाची आज अजिंक्यता-याला गवसणी

मुंबई, पुणे, काेल्हापूरहून साता-याला येताय! त्यापुर्वी हे वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com