महाराष्ट्रात अभिनव क्रांती; महाबळेश्वरात फुलणार लाल-हिरव्या भाताची शेती!

Mahabaleshwar Department of Agriculture
Mahabaleshwar Department of Agricultureesakal

भिलार (सातारा) : महाबळेश्वरात निळा भात (Blue Rice) व केशरचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. त्यात कृषी विभागाला यशदेखील प्राप्त झाले. या यशानंतर आता महाबळेश्वरात कृषी विभागाने (Mahabaleshwar Department of Agriculture) महाराष्ट्रात प्रथमच लाल आणि हिरव्या भाताची लागवड करून कृषी विभागात (Agriculture Department) अभिनव क्रांती केली आहे. महाबळेश्वरातील बिरवाडीत कृषी विभागामार्फत पौष्टिक अशा हिरव्या व लाल भाताची लागवड करण्यात आली आहे. (For The First Time In Maharashtra Red And Green Rice Will Be Planted In Mahabaleshwar)

Summary

महाराष्ट्रामध्ये प्रथमच हिरव्या भाताची लागवड होत आहे. ‘तिलकस्तुरी’ हे हिरव्या भाताचे वाण असून, ते १४० दिवसांमध्ये तयार होते.

बिरवाडीतील शेतकरी समीर चव्हाण (Farmer Sameer Chavan) यांच्या शेतात एसआरटी म्हणजे सगुणा भात तंत्रज्ञान या पद्धतीने गादी वाफ्यावर करण्यात आली. भात हे सर्वसामान्यांचे व सर्वांचे मुख्य अन्न आहे. भात म्हटले, की फक्त पांढरा रंग आठवतो; परंतु मागील आठवड्यात महाबळेश्वर तालुक्यात निळ्या भाताची लागवड करण्यात आली. आता हिरवा व लाल भाताचीही (Green And Red Rice) लागवड करण्यात आली आहे. ही लागवड करताना शेतकरी वर्गाला कृषी विभागाचे मार्गदर्शन लाभले. या वेळी सातारा कृषी उपसंचालक विजय राऊत, वाई उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, सातारा तंत्र अधिकारी महामुलकर, कृषी अधिकारी राजेंद्र देशपांडे, मंडळ कृषी अधिकारी बुधावले, कृषी सहायक दीपक बोर्डे, विशाल सूर्यवंशी, शेतकरी समीर चव्हाण उपस्थित होते.

Mahabaleshwar Department of Agriculture
महाबळेश्‍वरात आढळलेल्या 'निपाह'वर सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया

या ग्रीन राईसबद्दल माहिती देताना कृषी सहायक दीपक बोर्डे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रामध्ये प्रथमच हिरव्या भाताची लागवड होत आहे. ‘तिलकस्तुरी’ हे हिरव्या भाताचे वाण असून, ते १४० दिवसांमध्ये तयार होते. या भातपिकाची वाढ १२५ सेंमीपर्यंत होते. वनस्पतींच्या पानांमध्ये असणाऱ्या हरितद्रव्यामुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो. हेच पानांमध्ये असणारे हरितद्रव्य भातांच्या दाण्यांमध्ये आढळते. त्यामुळे भाताचे दाणे हिरवे दिसतात. त्यामुळे याला हिरवा भात किंवा ग्रीन राईस (Green Rice) म्हटले जाते, तसेच लाल भाताबद्दल माहिती देताना सांगण्यात आले, की ११० दिवसांचे लाल भाताचे वाण असून, यामध्ये ॲन्योसायनीनचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

Mahabaleshwar Department of Agriculture
हर्ष खरंच बेपत्ता होता की, मित्रांकडून अपहरण?

हिरव्या व लाल भाताची वैशिष्ट्ये...

हिरव्या भातात ९६ टक्के फायबर, फॅट फ्री, भात अँटिऑक्सिडेंटस, न्युट्रियन्टस व व्हिटॅमिन्स विपुल प्रमाणात आढळतात. लाल भातात फायबर, आर्यन, मॅंगेनीजचे प्रमाण जास्त आहे, तसेच मुबलक प्रमाणातील आर्यन व व्हिटॅमिन्समुळे रक्तातील लाल पेशींची संख्या वाढण्यास मदत होते. या भातात ब्राऊन भातापेक्षा दहा पट जास्त अँटिऑक्सिटेंडचे प्रमाण आहे.

For The First Time In Maharashtra Red And Green Rice Will Be Planted In Mahabaleshwar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com