German Tekdi area condition for Koyna landslide-affected people
sakal
- सचिन शिंदे
कऱ्हाड - सरकार काही देणार नाही आणि त्याची देण्याची मानसिकताही दिसत नाही. कोयनेचे भूमिपुत्र असूनही स्वतःच्याच मातीत गुलामासारखं जिणं जगतोय. पत्र्याच्या शेडमध्ये जगणं मुश्कील झालंय; पण आमचं मरण पाहायला कोणी फिरकलाही नाही... डोळ्यांत साचलेलं पाणी आणि सुकलेल्या ओठांनी मिरगावच्या भूस्खलनग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि पाच वर्षांनंतरही सरकारी व्यवस्थेच्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत, त्याची विदारक स्थितीही व्यक्त झाली.