esakal | साताऱ्यात फॉरेनर्सचा जिल्हा कारागृहात धुमाकूळ; विवस्त्र होऊन केली सीसीटीव्ही व टॉयलेटची तोडफोड

बोलून बातमी शोधा

Foreigners vandalizes jails CCTV and misbehaved with jail staff in Satara}

वाई येथे गांजा शेती करून जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्‍या परदेशी कैद्याने कारागृहात धुमाकूळ घातला आहे. त्याने कारागृहातील सीसीटीव्ही व शौचालयाच्या दरवाजाची मोडतोड केली आहे.

साताऱ्यात फॉरेनर्सचा जिल्हा कारागृहात धुमाकूळ; विवस्त्र होऊन केली सीसीटीव्ही व टॉयलेटची तोडफोड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : वाई येथे गांजा शेती करून जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्‍या परदेशी कैद्याने कारागृहात धुमाकूळ घातला आहे. त्याने कारागृहातील सीसीटीव्ही व शौचालयाच्या दरवाजाची मोडतोड केली आहे. विवस्त्र होऊन करागृहातील कर्मचार्‍यांशी असभ्य वर्तन केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात कारागृहातील हवालदार सुरेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील विष्णू श्री स्मृती या बंगल्यात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी 29 किलो गांजा इतर साहित्य असा एकूण 21 हजार रूपंयाचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी सर्गीस व्हिक्टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा.जर्मनी, सध्या रा.नंदनवन कॉलनी, वाई) या परदेशी नागरीक असलेल्या संशयितांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान 22 फेब्रुवारीला सायंकाळी पाचच्या सुमारास संबंधित संशयितांनी कारागृह कर्मचारी फाळके व ओव्हाळ या दोघांशी उद्धट वर्तन करण्यास सुरूवात केली.

तसेच या दोन्ही कर्मचार्‍यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कारागृहातच विवस्ञ होऊन धिंगाणा घातला. हा प्रकार शांत झाल्यानंतर फाळके व ओव्हाळ हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील पंधरा क्रमांकाच्या विभागात गस्त घालत असताना त्यांना पाहून संशयितांनी चिडून जावून पंधरा क्रमांकाच्या विभागातील ते बंदिस्त असलेल्या खोली क्रमांक पाचमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. मुजावर करत आहेत.