esakal | लाकडाची चोरटी वाहतूक करणारे वन विभागाच्या ताब्यात; आंबेदरेत आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Forest Department

आंबेदरे येथून लाकडाची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती मानद वन्यजीव संरक्षक सुनील भोईटे यांना मिळाली होती.

लाकडाची चोरटी वाहतूक करणारे वन विभागाच्या ताब्यात

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : आंबेदरे (ता. सातारा) येथे लाकडाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना वन विभागाच्या (Forest Department) पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांकडून वन विभागाने ट्रॅक्‍टर ट्रॉली व एक पिकअप जीप असा सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Forest Department Takes Action Against Timber Thief At Ambedare Village Satara Crime News)

आंबेदरे येथून लाकडाची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती मानद वन्यजीव संरक्षक सुनील भोईटे (Sunil Bhoite) यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली. यानंतर वन विभागाच्या भरारी पथकातील दीपक गायकवाड, गणेश वीरकर, सुहास पवार, विजय भोसले, सुधीर सुकाळे, ओंकार ढाळे यांनी त्याठिकाणी जात वाहतूक थांबवत ट्रॅक्‍टर, ट्रॉली, पिकअप जीप, तोडलेली लाकडे असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रल्हाद वसंतराव शेडगे (रा. शाहूपुरी), बाजीराव प्रकाश लोंढे (रा. माजगावकर माळ) यांच्यावर वन विभागाच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रश्नावर उदयनराजे घेतील निर्णय?

Forest Department Takes Action Against Timber Thief At Ambedare Village Satara Crime News