नितीशकुमारांची कारकीर्द संपविण्याचा भाजपचा डाव, चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप

सचिन शिंदे
Wednesday, 18 November 2020

नितीशकुमार यांना भाजपने संपविण्याचा कट निश्चित केला. त्यामुळेच पासवान यांनी भाजपच्या नव्हे, तर नितीशकुमार यांच्या उमेदवारांविरोधात आपले उमेदवार दिले आहेत. त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केला आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : चिराग पासवानच्या नेतृत्वाला भाजपनेच खतपाणी घालून मोठे केले. त्यामुळेच नितीशकुमार यांची कारकीर्द संपविण्याचा घाटच घातला गेला. बिहारच्या निवडणुकीत काॅंग्रेस आघाडीचे काम निराशाजनक झाल्याची कबुलीही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 

दहा वर्षातील संपत्तीचे विवरण द्यावे, अशी आयकर विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिवाळीतच नोटीस बजावली आहे. त्याबाबत श्री. चव्हाण यांनीच पत्रकारांना माहिती दिली. यावेळी त्यांनी बिहार निवडणुकीवरती देखील भाष्य करत आपले मत मांडले.

केंद्राच्या वन्यजीव नियंत्रण समितीवर सातारचा दबदबा; पर्यावरण अभ्यासक भाटे, खामकरांची सदस्यपदी नियुक्ती

चव्हाण म्हणाले, नितीशकुमार यांना भाजपने संपविण्याचा कट निश्चित केला. त्यामुळेच पासवान यांनी भाजपच्या नव्हे, तर नितीशकुमार यांच्या उमेदवारांविरोधात आपले उमेदवार दिले आहेत. त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. सध्या बिहार राज्यावर नितीशकुमार यांची हुकूमत असली तरी, भाजपला ती मान्य नसल्याने नितीशकुमारांना निवडणुकीत कमी जागावर समाधान मानावे लागले. निवडणुकीत तेजस्वी यादव यांची उत्तम कामगिरी पहायला मिळाली आहे. ही भाजपासाठी धोक्याची घंटा आहे. बिहारमध्ये काॅंग्रेसला समाधानकारक यश मिळाले नसले तरी आगामी काळात  काॅंग्रेस पक्ष मोठा फरकाने उभारी घेईल, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Chief Minister Prithviraj Chavan Criticizes BJP Satara News