'राजीनाम्याच्या धमकीमुळं घरफळा कमी, गोलमाल करण्याचा प्रयत्न'

Resigned
Resignedesakal
Updated on
Summary

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घरफळा कमी करण्याचे नाटक करण्यात आले आहे.

खटाव : ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी (Gram Panchayat Election) परिवर्तन पॅनेलच्या नेत्यांनी खटावकरांचा घरफळा माफ करण्याचे आणि पाणीपट्टी स्वतः भरण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्याच काही सदस्यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची धमकी दिल्यानेच ग्रामसभेत घरफळा कमी करण्याचा निर्णय घेऊन गोलमाल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप माजी सरपंच कॅप्टन बबनराव घाडगे (Babanrao Ghadge) यांनी केला.

येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीने घरफळा कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला श्री. घाडगे यांनी विरोध दर्शवत निवेदनाद्वारे आक्षेप घेतला. श्री. घाडगे यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी परिवर्तन पॅनेलच्या नेत्यांनी जाहीर सभेत घरफळा माफ करू, तसेच पाणीपट्टी स्वतःच्या खिशातून भरू, अशी आश्वासने दिलेली होती. निवडणूक होऊन अडीच वर्षे झाली तरी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नव्हती. कोरोनासारख्या काळातही गावात घरपट्टी व पाणीपट्टीची सक्तीने वसुली सुरूच होती आणि आहे.

Resigned
निवडणुकीत होणार दहा लाखांचा चुराडा; उमेदवाराला दोन लाखांची मर्यादा

‘परिवर्तन’च्याच काही सदस्यांनी ग्रामपंचायत बैठकांत घरफळा व पाणीपट्टीबाबत आक्रमक भूमिका घेत निवडणुकीत मते मिळविण्यासाठी गावकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळा अन्यथा राजीनामा घ्या, अशी भूमिका घेतली. त्यामुळे नाईलाजाने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आणि येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घरफळा कमी करण्याचे नाटक करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी ‘परिवर्तन’च्या आश्वासनांवर एकदा विश्वास ठेऊन बघितले आहे. सूज्ञ गावकरी आता पुन्हा त्यांच्या आश्वासनांना भुलणार नाहीत.’’ याप्रश्‍नी जे बैठकीमधून उठून गेले होते आणि राजीनामा देतो बोलले होते, त्यांचे मी अभिनंदन करतो. या सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यामुळेच घरफळा कमी करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांना घ्यावा लागल्याने त्यांनी याचे श्रेय घेऊ नये, असा सल्लाही श्री. घाडगे यांनी दिला.

Resigned
'गोवा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीती आखणार'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com