
खंडाळा : कण्हेरी (ता. खंडाळा) येथे शेजारील शेताला लागलेल्या आगीची आपल्या सीताफळाच्या बागेला झळ बसू नये, यासाठी आग विझविताना होरपळून जखमी झालेल्या माजी सरपंच संपत पाटणे यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ते होरपळून गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, आगीत होरपळून मृत्यू होण्याची ही सलग दुसरी घटना आहे.