
ढेबेवाडी : रात्रीच्या सुमारास रस्त्यात उभ्या केलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार माजी सैनिकाचा मृत्यू झाला. नथुराम परशुराम सावंत (वय ६१ रा. धामणी) असे मृताचे नाव आहे. गुढे- काळगाव मार्गावर मोरेवाडी (ता. पाटण) गावच्या हद्दीत हा अपघात झाला. पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, पोलिसांनी ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल केला आहे.