

जाधववाडी : शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं मंदिर नाही, तर आयुष्यभराची शिदोरी आणि आठवणींचा खजिना असतो. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय, फडतरवाडी (ता. फलटण) येथील सन १९९४- ९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला स्नेहमेळावा तरडगावमध्ये उत्साहात झाला.