वसंतगडावरील ऐतिहासिक चुन्याचा घाणा तब्बल 350 वर्षांनंतर सुरू

Fort Vasantgad Area
Fort Vasantgad Areaesakal
Summary

या घटनेनं साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या शिवकालीन वास्तुकलेला उजाळा मिळाला आहे.

कऱ्हाड (सातारा) : किल्ले वसंतगडावरील Fort Vasantgad (ता. कऱ्हाड, जि. सातारा) ऐतिहासिक चुन्याचा घाणा तब्बल साडेतीनशे वर्षानंतर सुरू करण्यात आला आहे. किल्ल्यावरील बुरुरांज्या संवर्धनासाठी त्या घाण्यातील चुना (limestone) वापरण्यात येणार आहे. बैलांच्या सहाय्यानं त्या घाण्यात चुन्याची मळणी करुन चुना तयार करण्यात येत आहे. त्यामुळं ३५० वर्षांपूर्वीच्या शिवकालीन पध्दती पुन्हा उजेडात आली आहे.

किल्ले वसंतगडावर टीम वसंतगड आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून ऑगस्ट 2020 मध्ये ढासळलेल्या बुरुजांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार वसंतगडाच्या पश्चिम दरवाजाजवळील ढासळलेल्या बुरुजांची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गडावरील चुन्याच्या घाण्याला बैलजोडीच्या सहाय्यानं शिवकाळात बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या उडीद डाळ, काळा गूळ, चुना, रेती यासह विविध प्रकारच्या  साहित्याची मळणीही करण्यात आली. तब्बल साडेतीनशे वर्षांनंतर स्वराज्यातील एखाद्या किल्यावर ऐतिहासिक वस्तूंची डागडुजी करण्यासाठी तत्कालीन चुन्याचा घाणा सुरू करण्याची ही महाराष्ट्रातील बहुदा पहिलीच वेळ असावी. या घटनेनं साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या शिवकालीन वास्तुकलेला उजाळा मिळाला आहे.

Fort Vasantgad Area
दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात; कऱ्हाडात आढळलं सातवाहनकालीन जातं

वसंतगडावर प्रत्येक रविवारी दुर्गसंवर्धनाचे काम करण्यात येत असून तळबीड, वसंतगड व परिसरासह तालुका आणि जिल्ह्यातील शिवप्रेमी, दुर्गसंवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. डागडुजीसाठी वापरण्यात येणाऱ्याच्या चुन्याच्या निर्मितीसाठी घाण्याचा वापर केला जात आहे. त्याचा नुकताच प्रारंभ कऱ्हाड आरटीओ कार्यालयाचे अधिकारी चैतन्य कणसे, तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. स्वराज्यकार्य टीम वसंतगड व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे मावळे, शिलेदार, दुर्गसेवक यांच्यासह तळबीड, वसंतगड व परिसरातील शिवप्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Fort Vasantgad Area
Political News : दोन दिवसांत ठरणार अध्यक्षपदाचा 'हुकमी एक्का'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com