पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी कऱ्हाडला 48 मतदान केंद्र

हेमंत पवार
Monday, 30 November 2020

ज्या मतदारांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे, अशांनी आगाऊ माहिती निवडणूक यंत्रणेला द्यावी. त्यांना मतदान करायचे असल्यास त्यांना स्वतंत्र रुग्णवाहिकेची सोय करून मतदानासाठी आणण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी दिघे यांनी सांगितले. त्यामुळे आता कोरोना बाधितांनाही मतदान करता येणार आहे.

कऱ्हाड : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या एक डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. कऱ्हाड तालुक्‍यात पदवीधरचे 15 हजार 581, तर शिक्षक मतदार एक हजार 882 आहेत. पदवीधरसाठी 40, तर शिक्षकांसाठी आठ मतदान केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रांताधिकारी उत्तम दिघे व तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी ही माहिती दिली.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्स ठेऊन मतदार मतदान करतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांची प्रत्येक केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 62 उमेदवार आहेत. त्यामुळे मतदानासाठी वेळ लागणार आहे. त्याचा विचार करून मतदानासाठी गर्दी झाल्यास शेजारील खोल्यात बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
 
तालुक्‍यात पदवीधरचे 15 हजार 581, तर शिक्षक मतदार 1 हजार 882 आहेत. पदवीधरसाठी 40, तर शिक्षकांसाठी आठ मतदान केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. आठ केंद्रामध्ये कऱ्हाडमध्ये दोन, तर उंब्रज, काले, उंडाळे, सुपने, शेणोली, कोळे येथे प्रत्येकी एक केंद्राचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेसाठी 378 कर्मचारी, नऊ क्षेत्रीय अधिकारी आणि 62 सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

ज्या मतदारांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे, अशांनी आगाऊ माहिती निवडणूक यंत्रणेला द्यावी. त्यांना मतदान करायचे असल्यास त्यांना स्वतंत्र रुग्णवाहिकेची सोय करून मतदानासाठी आणण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी दिघे यांनी सांगितले. त्यामुळे आता कोरोना बाधितांनाही मतदान करता येणार आहे.

त्रिशंकूच्या आराखड्यासाठी पालिकेची विशेष सभा बाेलवा : निशांत पाटील

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty Eight Voting Station In Karad For Pune Graduate Election Satara News