सातारा : सदरबझारमधील कालव्यात युवकाचा सापडला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deathbodie

सातारा : सदरबझारमधील कालव्यात युवकाचा सापडला मृतदेह

सातारा - सदरबझारमधील कालव्यामध्ये आज सकाळी गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची खून असलेल्या अंदाजे ३० ते ३५ वयाच्या युवकाचा मृतदेह सापडला. संबंधित युवकाने आत्महत्या केली, की घातपाताचा प्रकार आहे याबाबत पोलिस अद्याप साशंक आहेत. सदरबझारमधील कालव्यामध्ये आज सकाळी एका युवकाचा मृतदेह असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. या वेळी मृतदेहाच्या गळ्यावर वार केल्याच्या खूना आढळल्या; परंतु या जखमा फार खोलवर नव्हत्या. त्यामुळे संबंधित युवकाने आत्महत्या केली, की घातपात झाला याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला आहे. त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. संबंधित युवकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत. संबंधित युवकाच्या अंगावर मरून- काळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट, गळ्यात काचेच्या मन्यासारखी गणपती फोटो असलेली माळ, डाव्या हातात काळ्या रंगाचे दोन- तीन वेढे घातलेला गोफ, खिशात पिवळ्या रंगाचा कंगवा व लाल रंगाचा चौकडी रुमाल होता. अशा व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.

Web Title: Founded Deathbody In Canal At Sadarbazar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top