
कातरखटाव : बनपुरी (ता. खटाव) येथे दुचाकी वाहनाला झालेल्या अपघातात नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत मोटारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अक्षत विलास देवकर, प्रसाद अंकुश देवकर, भावेश कुंडलिक देवकर, उदय सदाशिव तुपे (रा. बनपुरी, ता. खटाव) या चार संशयितांना आज पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांना वडूज येथील न्यालयात हजर केले असता त्यांना २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.