काळज (ता. फलटण) गावच्या हद्दीत फलटण- लोणंद रस्त्यावर संशयित मोन्या निंभोरे, अजय सपकाळ, प्रवीण मोहिते, विजय सपकाळ, बंड्या जाधव (सर्व रा. साखरवाडी, ता. फलटण) यांनी आपापसात संगनमत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सोडून दिले होते.
Kidnapping Unfolds Over Old Feud; Lonand Police Arrest Four AccusedSakal
लोणंद : जिंती (ता. फलटण) येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे जुन्या भांडणाच्या कारणावरून अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील पाचपैकी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली.