सणबूरला भरवस्तीत घुसला बिबट्या!

राजेश पाटील
Friday, 16 October 2020

वाल्मीक पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वसलेल्या सणबूर परिसरात बिबट्यासह वन्यप्राण्यांचा वारंवार उपद्रव जाणवतो. आठवड्यापूर्वी तेथून एक कुत्रेही बिबट्याने पळवून नेले होते. गावाजवळच्या सुतारवाडीतील अमित सुतार यांच्या कोंबड्यांच्या शेडमध्ये घुसून 35 कोंबड्यांचाही त्याने फडशा पाडल्याची घटना घडली होती.

ढेबेवाडी (जि. सातारा) : कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या व त्याचा बछडा गावात घुसल्याची घटना गुरुवारी रात्री सणबूर (ता. पाटण) येथे घडली. आज (शुक्रवार) सकाळी तेथील एका बोळातील चिखलात बिबट्या व त्याच्या बछड्याच्या पंजाचे उमटलेले ठसे बघून गावकरी घाबरले. वन विभागाने तातडीने पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

वाल्मीक पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वसलेल्या सणबूर परिसरात बिबट्यासह वन्यप्राण्यांचा वारंवार उपद्रव जाणवतो. आठवड्यापूर्वी तेथून एक कुत्रेही बिबट्याने पळवून नेले होते. गावाजवळच्या सुतारवाडीतील अमित सुतार यांच्या कोंबड्यांच्या शेडमध्ये घुसून 35 कोंबड्यांचाही त्याने फडशा पाडल्याची घटना घडली होती. काल रात्री तर तो चक्क सणबूर गावातच येऊन गेल्याचे समोर आले. आज सकाळी तेथील संदीप जाधव व आनंदा कुंभार यांच्या घरांच्या मध्ये असलेल्या बोळातील चिखलात बिबट्या व त्याच्या बछड्याच्या पंजाचे उमटलेले ठसे बघून गावकरी घाबरले. 

शिरवळ : पानसरे वस्तीत बिबट्याचा रेडकावर हल्ला

भक्ष्याच्या पाठीमागून बिबट्या गावात आल्याचा ग्रामस्थांचा अंदाज आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य संदीप जाधव म्हणाले, वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालल्याने संरक्षक कुंपणाची मागणी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने वन विभागाकडे केली असली तरी त्याकडे दुर्लक्ष झाल्याने दिवसागणिक काळजी वाढत चालली आहे, असे त्यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Movement Of Leopard In Sanbur Area Satara News