उंडाळेत उद्या स्वातंत्र्यसैनिक मेळावा : उदयसिंह पाटील- उंडाळकर

उंडाळेत उद्या स्वातंत्र्यसैनिक मेळावा : उदयसिंह पाटील- उंडाळकर
Updated on

कऱ्हाड : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब उंडाळकर यांच्या 47 व्या पुण्यतिथीनिमित्त उद्या (ता.18) स्वातंत्र्यसैनिकांचा मेळावा होणार आहे. दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी ही माहिती दिली. स्मारक समितीचे विश्वस्त माजी प्राचार्य गणपतराव कणसे, प्रा. धनाजी काटकर उपस्थित होते.

ऍड. पाटील म्हणाले, ""माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या संकल्पनेतून उंडाळे येथे दादा उंडाळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दर वर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या माध्यमातून गेली 45 वर्षे प्रबोधनाचे काम सुरू आहे. मागील महिन्यात या कार्यक्रमाचे प्रवर्तक माजी मंत्री विलासकाका यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या 47 व्या पुण्यतिथीनिमित्त यंदा 18 फेब्रुवारीला साध्या पद्धतीने स्वातंत्र्यसैनिक मेळाव्याचे आयोजन केले आहे. 

त्यामध्ये 38 वे स्वातंत्र्य संग्राम अधिवेशन, माजी सैनिकांचा मेळावा होणार आहे. त्याच कार्यक्रमात मागील वर्षी व्याख्यानासाठी उपस्थित असणारे डॉ. गणादेवी यांच्यासह अन्य व्याख्याते आणि माजी मंत्री उंडाळकर यांचे सहा नोव्हेंबरच्या शेवटच्या भाषणाच्या संग्रहित सन्मानिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. यापुढे माजी सैनिकांचा मेळावा घेण्यात येईल. प्रा. कणसे म्हणाले, ""दर वर्षी देशभरातील महान विभूती विलासकाकांच्या प्रयत्नाने उंडाळेत येऊन विचार मांडत होते. त्यातून समाजप्रबोधन होत होते. मात्र, काकांच्या निधनाने यंदाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने होत असून, त्यासाठी इचलकरंजीचे प्रसाद कुलकर्णी आणि पत्रकार संजय आवटे हे 18 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.''

सरकार आणि शिक्षणमंत्री जे जे सांगत आहेत त्या सर्वाचे आम्ही पालन करीत आहाेत मात्र आमच्याकडे लक्ष कधी दिला जाणार?

आनंदावर अद्याप विरजणच! कऱ्हाडात चित्रपटगृहे सुरू करण्याची मागणी

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी शिवसेनाप्रमुखांनी वक्‍तृत्वाची तलवार अखेरपर्यंत तळपत ठेवली : शंभूराज देसाई 

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा अपमान महाराष्ट्र अजून किती सहन करणार?

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Girl Dhairya Creates History with Yunam Peak Ascent at Just 14
Hard Work Pays Off as Kival Youth Clear Police Recruitment Exams
Satara’s Daughter Shines at the Border; Amit Shah Appreciates BSF Jawan Asmita Jadhav
Satara:सरकारी योजनेनं घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण वादळानं हिरावलं; शेवटचा हप्ता मिळण्याआधीच अस्मानी संकटात कुटुंब उघड्यावर
Marathi News Esakal
www.esakal.com