
प्रमोदच्या तीन छोट्या मुली, पत्नी व आई एवढ्याच व्यक्ती कुटुंबात आहेत. सलून व्यवसायाद्वारे कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या प्रमोदच्या अकाली जाण्यामुळे व घरात कोणीही कर्ता पुरुष नसल्याने या कुटुंबाला दैनंदिन जीवनही जगणे कठीण झाले होते.
पुसेगाव (जि. सातारा) : येथील प्रमोद देवकर यांचे एक महिन्यापूर्वी अकाली निधन झाले. मुलाच्या अकाली निधनानंतर केवळ 15 दिवसांच्या अंतराने त्यांचे वडील रमेश यांचेही निधन झाले. या दोघांच्या निधनामुळे निराधार झालेल्या देवकर कुटुंबीयांना प्रमोद यांच्या मित्र परिवारातर्फे 43 हजार रुपयांची मदत करण्यात आली.
येथील नाभिक व्यवसाय करणारे प्रमोद यांचा पुसेगाव येथे मोठा मित्र परिवार आहे. गेल्या महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांचेही आकस्मिक निधन झाले. या दोघांच्या निधनामुळे प्रमोदचे संपूर्ण कुटुंबिय निराधार झाले. प्रमोदच्या तीन छोट्या मुली, पत्नी व आई एवढ्याच व्यक्ती कुटुंबात आहेत. सलून व्यवसायाद्वारे कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या प्रमोदच्या अकाली जाण्यामुळे व घरात कोणीही कर्ता पुरुष नसल्याने या कुटुंबाला दैनंदिन जीवनही जगणे कठीण झाले होते.
एलसीबीच्या धडाकेबाज छाप्याने सेटलमेंट उघडकीस; पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात!
ही बाब प्रमोदच्या मित्र परिवाराच्या लक्षात येताच 24-25 मित्रांनी ऐपतीप्रमाणे पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. बघता-बघता 43 हजार रुपये जमा झाले. अरुण मदने, संजय जाधव, जगदीश कुचेकर, विनोद जाधव, सागर घोरपडे, गजानन थोरात, कैलास ठोंबरे, बाबू मदने यांनी जमा झालेले पैसे प्रमोदच्या पत्नीकडे नुकतेच सुपुर्द केले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे