आज दुपारी उंडाळे येथे माजी मंत्री उंडाळकर यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

आज दुपारी उंडाळे येथे माजी मंत्री उंडाळकर यांच्यावर होणार अंत्यसंस्कार
Updated on

कराड : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी सहकार मंत्री विलासराव (काका) पाटील उंडाळकर याचं आज (सोमवारी) पहाटे उपचार सुरू असताना सातारा येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सातारा शहरासह जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी पाेचले.

गेले काही दिवस माजी मंत्री पाटील यांच्यावर सातारा येथे एका खासगी रुगणालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे आज (सोमवारी) पहाटे निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी उंडाळे येथे दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काकांनी उदयनराजेंना राजकारणातील हिरो बनविले

सकाळी साडे दहा अकराच्या सुमारास त्यांचे पार्थिव साताऱ्याहुन कराडला आणण्यात येईल. कराडच्या बाजार समितीत दुपारी साडेबारा पर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. त्यांनंतर पार्थिव त्यांच्या मूळगावी उंडाळे येथे नेण्यात येईल. तेथे दुपारी दाेन ते तीन या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर तीन वाजता तेथे अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर यांच्या निधनाने अनेकांना शाेक अनावर झाला आहे.
पृथ्वीराज चव्हाण-विलासराव पाटील उंडाळकरांचे मनोमिलन यशस्वी; अपक्षांचे आव्हान 

फास्टॅगच्या बंधनावर तासवडे, आनेवाडीत उसळणार विराेधाची लाट? 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com