गणेशोत्सवाचं पावित्र्य राखा; पोलिस अधिकारी नीलेश देशमुखांचं मंडळांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

गणेशोत्सवाचं पावित्र्य राखा; पोलिस अधिकारी नीलेश देशमुखांचं मंडळांना आवाहन

दहिवडी : गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करताना गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा. तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी केले.

दहिवडी पोलिस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळे तसेच पोलिस पाटील यांची संयुक्त बैठक येथील माऊली मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार अंकुश इवरे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगांवकर, नगराध्यक्ष सागर पोळ, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राजेश डावरे, महावितरणचे सहाय्यक अभियंता रंजित देशमुख, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, गुप्तवार्ता विभागाचे संदीप खाडे, गोपनीय विभागाचे प्रकाश इंदलकर, रावसाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

डाॅ. निलेश देशमुख म्हणाले, गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या सुचना, अटी व नियमांचे काटेकोर पालन करायचे आहे. गणेशोत्सवाच्या मुर्ती, मंडप, सजावट, मिरवणूक यासह कार्यक्रमांची माहिती पोलिस ठाण्यात द्यायची आहे. कोणाच्या भावना दुखावतील वा कोणाला त्रास होईल असं कृत्य करायचं नाही.

संतोष तासगांवकर म्हणाले, गणेशोत्सव काळात सामाजिक भान पाळायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत डाॅल्बी वा डि.जे. यांना परवानगी दिली जाणार नाही. जे कोणी नियम मोडतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच पुढील वर्षी संबंधित मंडळास गणेशोत्सवाची परवानगी दिली जाणार नाही.

रावसाहेब देशमुख यांनी गणेशोत्सव काळात सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवावेत तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे नियोजन करुन त्यांना बक्षिसे द्यावीत असे आवाहन केले. यावेळी संदीप खाडे, किशोर इंगवले व चंद्रकांत बागल यांनीही मनोगत व्यक्त केले. आप्पासाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले व प्रकाश इंदलकर यांनी आभार मानले.

दहिवडी : गणेशोत्सव मंडळे व पोलिस पाटील यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. निलेश देशमुख उपस्थित संतोष तासगांवकर, सागर पोळ आदी मान्यवर.

Web Title: Ganeshotsav Maintain The Sanctity Police Officer Nilesh Deshmukh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..