कऱ्हाड : मांडूळ, कासवाची तस्करी करणाऱ्या चौघांची टोळी गजाआड

वनविभागाची राजमाचीत कारवाई; अटकेतील चौघापैकी तिघेजण अकलूजचे तर एकजण माण तालुक्यातील
कऱ्हाड : मांडूळ, कासवाची तस्करी करणाऱ्या चौघांची टोळी गजाआड
कऱ्हाड : मांडूळ, कासवाची तस्करी करणाऱ्या चौघांची टोळी गजाआड sakal

कऱ्हाड ः मांडूळ व कासवाची तस्करीने विक्री करण्यासाटी आलेल्या चौघांच्या टोळीला वन विभागाने शिताफीने अटक केली. राजमाची येथील एका हॉटेलवर आज दुपारी दिडच्या सुमारास छापा टाकून कारवाई झाली. रोहित साधु साठे, ( वय 20) प्रशांत रामचंद्र रसाळ (20), अविनाश आप्पा खुडे (21 , तिघे रा. अकलूज) व सुनील तानाजी सावंत ( 28 , रा. दिवड, ता.माण) अशी त्यांची नावे आहेत. चोघेजण तस्करीने मांडूऴ व कासवाची विक्री करण्यास येमार आहेत, अशी माहिती वन विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार राजमाची येथे शिताफीने अटक करून कारवाई झाली. जीवंत मांडूळ व कासव हस्तगत केले आहे.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील तिघेजण अकलूजचे तर एकजण सातारा जिल्ह्यातील आहे. दुपारी दि़डच्या सुमारास संबधात चोघेही दोन दुचाकीवरून राजमाची येथे आले होते. तेथे ते एका हॉटेलमध्ये जेवण होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. त्याचवेळी तेथे असलेल्या वनविभागाचे सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, फिरते पथकाचे वनरक्षक विजय भोसले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी हॉटेलमध्ये जाऊन त्याची तपासणी केली त्यावेळी त्यांच्याजवळ पिशवीत जिवंत कासवासहीत जिवंत मांडूळ सापडले. कासव इंडियन सॉफ्ट शेल्ड टरटल व मांडूळ कॉमन सॅनड बोआ जातीचे आहे. दोन्ही अधिनियम १९७२ अंतर्गत शेड्युल मध्ये येतात. त्यांना पकडणे, बाळगणे, विक्रीसहीत मारणे, कायद्याने गुन्हा आहे. त्या नुसार चौघांना अटक झाली आहे. त्यांच्याकडील दोन्ही दुचाकी जप्त आहेत. त्यात एका दुचाकीवर क्रमाक नाही. चोघांकेडही कसून चौकशी सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com