दरोडेखोरांची टोळी पकडली ;पुसेगाव पोलिसांची कारवाई

राजापूर फाट्यावर पाच जण जेरबंद; तलवारी, दुचाकी जप्त
satara crime
satara crimeSakal

विसापूर : बुध गावाच्या हद्दीतील राजापूर फाट्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पुसेगाव पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. रविवारी (ता. ६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई झाली. संशयितांकडून चोरीच्या पाच मोटारसायकल, नऊ मोबाईल, दोन तलवारी, दरोडा टाकण्याचे साहित्य असा एकूण दोन लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विक्रम तुकाराम आगवणे (वय २८, रा. निंबोरे, ता. फलटण), रवींद्र भरत शिरतोडे (वय २०, रा. निंबोरे, ता. फलटण), दीपक शंकर मदने (वय १९, रा. गुरसाळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), आदित्य लाला जाधव (वय २०, रा. ठाकुरकी, ता. फलटण) आणि राजेश बापूराव पाटोळे (वय १९, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे, पोलिस कर्मचारी सुनील अबदागिरी, वैभव वसव, पुष्कर जाधव, उमेश देशमुख, अशोक सरक हे पेट्रोलिंग करत असताना बुध (ता. खटाव) गावच्या हद्दीत राजापूर फाटा येथे काही संशयित उभे असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता सर्व जण उडवाउडवीची उत्तरे देत शेताच्या दिशेने पळून जाऊ लागले. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावल्याने पाठलाग करून संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आल्याचे सांगितले.

या वेळी त्यांच्याकडे दोन मोटारसायकल, दोन तलवारी, पाच मोबाईल, एक स्क्रू ड्रायव्हर, एक पक्कड, व्हील पाना एक असे दरोडा टाकण्याचे साहित्य सापडले. पाचही संशयितांना पोलिस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी फलटण,बारामती, पुणे, पाटस, भिगवण या परिसरात चोऱ्या केल्याचेकबूल केले. त्यांच्याकडून चोरीच्या एकूण पाच मोटारसायकल (किंमत अंदाजे एक लाख ८० हजार रुपये) व एकूण ९ मोबाईल (अंदाजे किंमत ४५ हजार रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व संशयितांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे, पोलिस कर्मचारी सुनील अबदागिरी, अशोक सरक, वैभव वसव, पुष्कर जाधव, उमेश देशमुख, विजय खाडे, सचिन जगताप, दौलत कुदळे यांनी केली. संदीप शितोळे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com