Ganpati Idols Damaged in Wai Fire Vaibhav Arts
sakal
व्याहळी - ज्या हातांनी महिनाभरापासून बाप्पाच्या मूर्तींना आकार दिला, ज्या डोळ्यांनी उत्सवाचे स्वप्न पाहिले, त्या डोळ्यांसमोर काही तासांत सर्वकाही जळून खाक झाले. गणेशोत्सवाचा आनंद घराघरांत पोहोचवणाऱ्या वाई औद्योगिक वसाहतीतील वैभव आर्ट हस्तकला महिला उद्योगाला (बावळेकर गौरी-गणपती मूर्ती कारखाना) काल रात्री लागलेल्या भीषण आगीने पुरते उद्ध्वस्त केले आहे.