esakal | शेतकरी हवालदिल; लसूणाची विक्री अवघी 60 रुपये किलो

बोलून बातमी शोधा

शेतकरी हवालदिल; लसूणाची विक्री अवघी 60 रुपये किलो}

कोरोनाच्या शक्‍यतेने खोळंबा होऊ नये म्हणून महिलांची कांदा- लसूण चटणी तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे.

शेतकरी हवालदिल; लसूणाची विक्री अवघी 60 रुपये किलो
sakal_logo
By
मुकंद भट

ओगलेवाडी (जि. सातारा) :  कोरोना वाढू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा लॉकडाउन होणार असल्याच्या केवळ चर्चेमुळे व संचारबंदीच्या भीतीने शेतकऱ्यांवर येथील रस्त्यांवर फिरून ओरडून ग्राहकांना कवडीमोल दरात तोट्यात अवघ्या 60 रुपये किलो दराने लसूण घाईने विकण्याची वेळ आली आहे. बाजारात सध्या भाव 125 ते 150 रुपये किलो आहे. स्वस्त दरात लसूण खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड झाली. 

स्वस्त दराने ग्राहकांना लसूण मिळत असल्यामुळे दिलासा मिळत असला, तरी शेतकरी, विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर पडत्या भावाने माल विकण्याची पाळी आल्याने खिन्नता व चिंता पाहावयास मिळत आहे. वडूज भागातील चिंतातूर शेतकरी आबा जाधव म्हणाले, ""गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाला आम्ही तोंड देत होतो. नवा लसूण काढण्यास सुरुवात झाली होती. लसणाला चांगला दर मिळण्याची आशा होती, तेवढ्यात कोरोनाने पुन्हा तोंड वर काढले आणि शेतकरी हवालदिल होऊन व लॉकडाउन, संचारबंदीच्या भीतीने जवळ असलेला माल गावोगाव फिरून रस्त्यावर तोट्यात विकण्याची वेळ आमच्यावर आली आहे.''
 
हृदयाचा सच्चा दोस्त लसूण; अंकूरलेल्या लसणाचे आहेत खूप सारे फायदे

अपहरणकर्त्यांनी सरपंच पतीस माळशिरस तालुक्यातील पेट्रोल पंपावर दिले साेडून

दरम्यान, कोरोनाच्या शक्‍यतेने खोळंबा होऊ नये म्हणून महिलांची कांदा- लसूण चटणी तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. लाल मिरचीचा भाव 150 ते 300 रुपयांपर्यंत वाढला आहे. कांदा व मसाला साहित्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे या चटणी तयार करण्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. 

संतापाशी बहू असावी मर्यादा शिकवण द्यावी लागेल; पंढरीच्या मठातील धरपकडीवर अक्षयमहाराज आक्रमक

सहकारी संस्थांनी विरोधकांच्या भूमिकेला बळी पडू नये : केशव उपाध्ये

Edited By : Siddharth Latkar