How did a poor girl become a police officer in India?
esakal
कोरेगाव : सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा गावखेड्यातील अत्यंत गरीब कुटुंबातील १६ ते १७ वर्षे वयाची एक युवती दोघा दात्यांची आर्थिक मदत, पाठबळ व जिद्दीच्या जोरावर नुकतीच पोलिस दलात भरती (Inspirational Police Story) झाली. मोरोची (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील गौरी किसन खिलारे असे त्या युवतीचे नाव आहे, तिला एक मोठी बहीण व भाऊ आहे.