भाविकांनाे! श्री यमाईदेवीच्या मंदिराचे दरवाजे तात्पुरते राहणार बंद

शशिकांत धुमाळ
Wednesday, 13 January 2021

काेराेनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.

औंध (जि. सातारा) : प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी येथील मूळपीठ निवासिनी आणि ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवीचे मंदिर आजपासून (ता. 13, जानेवारी) चार फेब्रुवारीअखेर बंद राहील, अशी माहिती मूळपीठ देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यात्रा उत्सव आणि मकरसंक्रांत उत्सवाबाबत नुकतीच राजवाडा येथे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, सरपंच सोनाली मिठारी, सहायक पोलिस निरीक्षक उत्तमराव भापकर, उपसरपंच दीपक नलवडे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आत्तार, मंडलाधिकारी गजानन कुलकर्णी, सागर गुरव यांच्या उपस्थितीत झाली.

अजिंक्याता-याच्या विकासाचा सातारा पालिकेचा थेट किल्ल्यावरुनच निर्धार 

गुरुवारी (ता. 14 जानेवारी) मकरसंक्रांतीचा सण आहे आणि संक्रांतीला वाणवसा घेण्यासाठी औंधसह जिल्ह्यातून आणि परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर महिला भाविक औंधला येतात. शुक्रवारी (ता. 15) पौषी उत्सवातील धार्मिक विधीला (भोगी) सुरवात होते. त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थ लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी मंदिरात येतात. मात्र, कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. याचा प्रादुर्भाव होऊ नये, भाविकांना याचा त्रास होऊ नये याकरिता शासनाने यात्रा उत्सव साजरे करण्यासाठी निर्बंध घातले आहेत. शासनाने दिलेल्या नियमानुसार 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारीअखेर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहील. भाविकांनी आणि ग्रामस्थांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

भारतीय हाॅकी संघातील मुलींचा युवा वर्गास संदेश; माेबाईलच्या चक्रव्हूयातून बाहेर पडा, मैदानात उतरा!

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gayatridevi Panthprathinidhi Decleared Yamai Devi Temple From Aundh Closed Till Four February Satara Marathi News