
सातारा - कुटुंबात ‘मुलगा वंशाचा दिवा’ या म्हणीप्रमाणे मुलगा दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण मुलांच्या तुलनेत समप्रमाणात आले आहे. अनेक दांपत्यांचा कल मुलगी दत्तक घेण्याकडे वाढला आहे. सद्य:स्थितीत राज्यात ४,७०० पालक दत्तक घेण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे आकडेवारीवरून दिसते.