

-सुनील शेडगे
नागेवाडी : डोंगरउंचावर वसलेल्या, दुर्गम भागात असलेल्या गावातील या शाळकरी मुली. बहुतेकींच्या आई-वडिलांचे हात हे शेतात राबणारे. प्रतिकूल परिस्थिती अन् जेमतेम सुविधा. मात्र, या मुलींची धावणारी पावले थांबत नाहीत, की थकत नाहीत. त्यातूनच या मुलींनी गावाला, शाळेला लौकिक मिळवून दिला आहे.