कऱ्हाडातही कॉंग्रेसला सत्ता द्या; पृथ्वीराज चव्हाणांचं आवाहन

शहराला सर्वांगसुंदरसतेह संपन्न शहर बनवून दाखवू
मलकापुरात दिली तशी कऱ्हाडातही कॉंग्रेसला सत्ता द्या; पृथ्वीराज चव्हाणांचं आवाहन
मलकापुरात दिली तशी कऱ्हाडातही कॉंग्रेसला सत्ता द्या; पृथ्वीराज चव्हाणांचं आवाहनsakal

कऱ्हाड : मलकापूरला दिली तसी कऱ्हाडमध्येही कॉग्रेसला एक हाती सत्ता द्या, शहराला सर्वांगसुंदरसतेह संपन्न शहर बनवून दाखवू, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री आमदार पृत्वीराज चव्हाण यांनी दिली. कऱ्हाड पालिकेत नगरसवेकांतील समन्वयाचा अभाव आहे, त्यामुळे विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे शहराचा विकाही थांबला आहे, ते चित्र बदलण्यासाठी एक हाती सत्ता द्या, असेही आवाहन आमदार चव्हाण यांनी केले. काँग्रेस शहर कमिटीच्या नविन पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव प्रदीप जाधव, शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, अशोकराव पाटील उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले, कऱ्हाडला जिल्ह्याचा दर्जा देण्यासाठी योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. त्याचा विचार करूनच शहरात प्रशासकीय इमारत, आरटीओ कार्यालय, विश्रामग्रह, पोलीस वसाहत, बस स्थानकासहीत अेक सुविधा दिल्सुया आहेत. कऱ्हाडसाठी खूप काही करायचे आहे. शहरात येणारे पुराचे पाणी थांबवण्यासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कऱ्हाडला सहकार न्यायालय सुरू करायचे आहे.

मलकापुरात दिली तशी कऱ्हाडातही कॉंग्रेसला सत्ता द्या; पृथ्वीराज चव्हाणांचं आवाहन
आमदार अशोक पवारांना धमक्यांच्या निषेधार्थ सणसवाडीत रास्ता रोको

शहरातील विकास कामांबाबत प्रस्ताव येत नसल्याने निधी देता येत नाही. त्यातच नगरपलिकेत एक वाक्यता नाही. अडचणी निर्माण होत आहेत. अडचणी असूनही शहरात विकासकामे केली आहेत. यापुढेही करत राहणार आहे. शहरात एक हाती सत्ता दिल्यानंतर विकासकामांना भरपूर वाव असतो. मलकापूरात झालेली विकास कामे हे त्यासाटी सर्वोत्तम उदाहरण आहे.

भविष्यातील सर्वच निवडणुकांत संघर्ष अटळ आहे. त्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदे घेऊन काम करावीत. पदाधिकाऱ्यांनी वॉर्डमध्ये लक्ष घालून चाचणी करावी. लोकांच्या अडचणी समजून घ्याव्यात. विकासाबाबत चर्चा घडवावी. त्यातून सुचणाऱ्या विकास कामांची यादी माझ्याकडे द्यावी. शहरासाठी हवा तेवढा निधी आणला जाईल. काँग्रेसचे मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व विश्वजीत कदम यांच्याबरोबर बैठका घेऊन विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, यापुढे अनेक निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे काँग्रेसने एकजूट दाखवून येणार्‍या सर्व आव्हानांना तोंड द्यायचे आहे. कऱ्हाड शहर काँग्रेस विचारधारेच्या पाठीशी उभे राहिले आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम केले तर काहीही अशक्य नाही. शहराध्यक्ष आप्पा माने म्हणाले, शहरातील काँग्रेस पक्ष आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड नगरपालिकेच्या निवडणूकीत काँग्रेस ताकद लावणार आहे. पक्षाने स्वबळावर निवडणुक लढवावी. यावेळी प्रदीप जाधव, अशोकराव पाटील यांची भाषणे झाली. अॅड. अमित जाधव यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com