
नागठाणे (सातारा) : पोलिस असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक करत सोन्याची चेन (Gold chain) लंपास केल्याची घटना येथे नुकतीच घडली. दोन अनोळखी तरुणांनी या वेळी सुमारे ५३ हजार रुपये किमतीची चेन पळवली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा जगू नावडकर (वय ६९, रा. सोनापूर, ता. सातारा) यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. श्री. नावडकर हे पत्नीसह कामानिमित्त नागठाणे येथे दुचाकीवरून (Two-wheeler) आले होते. ते येथील पेट्रोल पंपावरून (Petrol pump) दुचाकीत पेट्रोल भरून सेवारस्त्याने नागठाण्याकडे यायला निघाले. (Gold Chain Stolen From Old Man On Service Road In Nagthane Satara Crime News)
पोलिस असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक करत सोन्याची चेन लंपास केल्याची घटना नागठाणेत नुकतीच घडली.
सेवारस्त्यानजीकच्या नाकोडा स्टील ट्रेडर्सजवळ ते आले असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांची गाडी थांबवली. या युवकांनी तोंडाला मास्क लावला होता. 'आपण पोलिस आहोत,' असे सांगून या रस्त्यावर चोऱ्या होत आहेत. तुमच्या सोन्याच्या वस्तू खिशात ठेवा, असे सांगितले. यावेळी श्री. नावडकर यांनी बोटातील अंगठी व घड्याळ काढून खिशात ठेवले. नंतर गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ठेवत असताना त्यांनी ती त्यांच्याकडील कागदावर ठेवण्यास सांगितले.
चेन ठेवल्यानंतर कागदाची पुडी करून ती परत त्यांना देत नीट ठेवण्यास सांगितले. ही पुडी त्यांनी दुचाकीच्या डिकीत ठेवली. ते नागठाण्याकडे आले. गावात आल्यानंतर त्यांनी खिशात ठेवलेली अंगठी व घड्याळ घातले. चेन घालण्यासाठी पुडी सोडल्यावर त्यात सोन्याची चेन नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दोन्ही युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आढळून आले नाहीत. चोरट्यांनी त्यांची ५३ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन पोलिस असल्याचा बनाव करत पळविली. त्यांनी याबाबतची फिर्याद बोरगाव पोलिस ठाण्यात (Borgaon Police Station) दाखल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ तपास करत आहेत.
Gold Chain Stolen From Old Man On Service Road In Nagthane Satara Crime News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.