Gondavale Murder Case : गोंदवलेतील खून प्रकरणाचा सूत्रधार जेरबंद; प्रेम प्रकरणातून घडलेल्या घटनेत आतापर्यंत पाच जणांना अटक
Satara Crime : खुनानंतर संशयितांनी त्याचा मृतदेह गाडीमध्ये टाकून तो वाहत्या कालव्यामध्ये फेकून दिला होता. दरम्यान, योगेश बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाइकांनी पोलिसात दिली होती.
Five arrests made in the Gondavale murder case, including the mastermind behind the tragic love affair-related killing."sakal
गोंदवले : येथील युवकाच्या प्रेम प्रकरणातून खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी दहिवडी पोलिसांनी चौघांना अटक केली; परंतु मुख्य सूत्रधार असलेल्या सागर माने याचा शोध सुरू होता. दरम्यान, आज पोलिसांनी फलटणमधून त्याला अटक केली.