गोंदवल्यात जाणार आहात? थांबा! महत्वपुर्ण निर्णय वाचा

गोंदवल्यात जाणार आहात? थांबा! महत्वपुर्ण निर्णय वाचा

गोंदवले (जि. सातारा)  : दहिवडीत कोरोना वाढल्यानंतर गोंदवल्यात विशेष खबरदारी म्हणून आजचा (गुरुवार) आठवडा बाजार रद्द केल्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने, तर येत्या शनिवारची पौर्णिमा यात्रा रद्द केल्याचा निर्णय समाधी मंदिर समितीने जाहीर केला आहे. 

तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुकमध्येही बाधितांची मालिका सुरूच आहे. दहिवडीत सलग दोन आठवडा बाजार बंद ठेवण्यात आले आहेत, तर म्हसवड येथील आठवडा बाजारही रद्द करण्यात आला. परिणामी गुरुवारी गोंदवल्यातील बाजारात मोठी गर्दी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गोंदवल्यातील आजचा (गुरुवार) आठवडा बाजारही रद्द करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
 
नियमांचे काटेकोर पालन करत श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात दर्शन सुरू आहे. येत्या शनिवारी (ता. 27) या महिन्यातील पौर्णिमा असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे; परंतु ही यात्रा रद्द केल्याचा निर्णय मंदिर समितीने जाहीर केला आहे. मंदिरात केवळ पुजाऱ्यांच्याच उपस्थितीत धार्मिक विधी होतील. 

दरम्यान गोंदवल्यातील समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग असतानाच अवघ्या काही फुटांवर अचानक वीजवाहक तारेने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला खरा; परंतु महामार्ग ठेकेदार व वीज कंपनीच्या आडमुठेपणामुळे जीवितास धोका असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

येथे महामार्गाचे काम सुरू असून, या कामांतर्गत रस्त्यालगत नव्याने विजेचे खांब व तारा टाकण्यात आल्या आहेत. येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिराच्या संरक्षक भिंतीला लागून उभारलेल्या खांबांवर हलक्‍या प्रतीच्या विजेच्या तारा टाकल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास समाधी मंदिरात भाविक रांगेतून दर्शन घेत होते. मंदिरापासून अगदी काही फुटांवर असलेल्या संरक्षक भिंतीवरून गेलेल्या वीजवाहक तारेने अचानक पेट घेतला. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे झालेल्या मोठ्या आवाजाने रस्त्यावरील लोकांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली, तर अगदी काही फुटांवर आगीचे लोट पडू लागल्याने भाविकही घाबरून पळाले. 

याचदरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील घटनास्थळी पोचून आग विझविण्याचे प्रयत्न केले. परंतु, वीजप्रवाह सुरू असल्याने आगीने अधिकच पेट घेतल्याने ते जखमी झाले. दरम्यान, काही नागरिकांनी विद्युत जनित्रचे फ्यूज काढल्याने ही आग विझविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत सुमारे सातशे ते आठशे फुटांपर्यंतच्या वीजवाहक तारा जळून खाक झाल्या. ही आग वेळीच आटोक्‍यात आली नसती तर लोकवस्तीत आग पसरण्याची भीती होती. परंतु, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

पैसे वाचवायचे आहेत? तीन अटींची अंमलबजावणी करा 

बाळाचा बोटीत जन्म; ग्रामस्थांत आनंदाश्रू

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com