
- फिरोज तांबोळी
गोंदवले : केवळ महिलादिनी गुणगान न गाता आम्ही कायम महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्धार गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीने केला. लवकरच महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व सुरक्षेसाठी गावपातळीवर स्वतंत्र ‘महिला सुरक्षा समिती’ निर्माण करण्यात येणार आहे. राज्यात महिला अत्याचार वाढत असतानाच अशी समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणारी ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.